"स्टेट बँक आपल्या दारी" उपक्रमाचा बेलापूरात गौरव - Maha Bhrashtachar

Breaking

Tuesday, June 20, 2023

"स्टेट बँक आपल्या दारी" उपक्रमाचा बेलापूरात गौरव

 




 बी.आर.चेडे - शिरसगांव

श्रीरामपूर - सुमित फोटो जानकी एजन्सी व संजीवनी विकास फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेट बँक आपल्या दारी उपक्रम बेलापूर खुर्द येथे राबवण्यात आला. नवनाथ शेलार यांनी साकारलेल्या कल्पनेचा स्टेट बँक ऑफ इंडिया च्या (फिरते ग्राहक सेवा केंद) चा बँक अधिकाऱ्यां कडून गौरव झाला.

कल्पना सर्वत्र लाभ दायक  या शिबिरात ग्राहक सेवा संचालक नवनाथ शेलार यांनी नागरिकांमध्ये सरकारी योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री जनधन खाते यांचे महत्त्व नागरिक व तरुणांमध्ये जनजागृती करण्यात आली. 



या शिबिरामध्ये यावेळी कॅम्पला भेट देण्यासाठी स्नेहल कुलकर्णी क्षेत्रीय कार्यालय ऑफिसर अहमदनगर,अमोल जवणे  जिल्हा समन्वयक संजीवनी विकास फाउंडेशन अहमदनगर जिल्हा विभाग, साक्षी जवणे  जिल्हा प्रतिनिधी संजीवनी विकास फाउंडेशन अहमदनगर यांनी भेट दिली यावेळी जयहो सामाजिक संस्था व ग्रामपंचायत कार्यालय बेलापूर खुर्द  यांनी मोलाचे सहकार्य केले.


वृत्तसंकलन:

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111 




Pages