श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्री.सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव आयोजित कै. सुशिलामाई काळे यांचे स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाची प्रथम वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु. प्रणाली पांडुरंग पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे,कवीवर्य प्रदिप निफाडकर, एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप , वक्तृत्व स्पर्धा संयोजक प्रो.डॉ.बाबासाहेब शेंडगे आदि मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र सोहळा नुकताच संपन्न झाला. रु.९०००/- रोख स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
चालू शैक्षणिक वर्षात कु.प्रणाली पाटील हिने महाराष्ट्रातल्या नामांकित स्पर्धा जिंकून बेलापूर महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविलेला आहे. चालू शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त वक्तृत्व स्पर्धा जिंकणारे हे महाविद्यालय ठरले आहे.तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, खजिनदार हरिनारायण खटोड, सचिव ॲड.शरद सोमाणी, सहसचिव दिपक सिकची, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड,श्रीवल्लभ राठी,रविंद्र खटोड,भरत साळुंके, बापूसाहेब पुजारी, नंदूशेठ खटोड ,चंद्रशेखर डावरे, हरिश्चंद्र पाटील महाडिक, नारायणदास सिकची, ॲड.विजय साळुंके,प्रेमा मुथ्था, म.वि.स. सदस्य राजेंद्र सिकची, प्रा. हंबीरराव नाईक, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.डॉ. गुंफा कोकाटे, वक्तृत्व समितीचे समन्वयक डॉ.बाळासाहेब बाचकर, डॉ अशोक माने , प्रा.निजाम शेख,सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी , समस्त ग्रामस्थ आदिंनी तिचे अभिनंदन केले आहे.
वृत्तसंकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111



