विकासकुमार बागडी यांना साप्ताहिक पत्रमहर्षी राज्य भूषण पुरस्कार प्रदान
विकासकुमार बागडी- जालना
व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विभागाचे राज्यव्यापी अधिवेशन नुकताच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी साप्ताहिक विभागाचा पत्रमहर्षी राज्य भूषण पुरस्कार जालना येथील संपादक विकासकुमार बागडी यांना देण्यात आला. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के, विनोद गोरे, निशिकांत भालेराव, जयंत महाजन, इरफान सय्यद, विजय चोरडिया, शिवाजी पाटील, संदीप शेळके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जालन्याचे ज्येष्ठ पत्रकार रमेश खोत, संतोष गाजरे, बाबासाहेब कोलते, दिनेश नंद, मनिष अग्रवाल, भगवान शहाणे, ज्ञानेश्वर ताकट, अजिम खान, शेख जावेद, शेख शब्बीर, तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे युवा आणि ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.
श्री. बागडी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. श्री. विकासकुमार बागडी यांना साप्ताहिक पत्रमहर्षी राज्य भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
वृत्तसंकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111



